Tata and Mistry dispute टाटा सन्समधील वाद कशामुळे आलाय चर्चेत?

टाटा समूह आदेशातील आघाडीचा बिजनेस ग्रुप आहे. टाटा सुमो हा सुमारे 400 कंपन्या आहेत आणि टाटा सुमो हा ची एकूण मालमत्ता सुमारे 25 लाख कोटी रुपये आहे. भारताच्या जीडीपीत टाटा समूहाचे सुमारे चार टक्के योगदान असते. त्यामुळे टाटा सुमूहातील कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय अथवा वाद याचा संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा ठरू शकतो.

टाटा समुह देशातील स्टील, ऑटो, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, उपभोक्ता वस्तू, हॉटेल व्यवसाय आदी उद्योगांमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. परंतु गेल्या काही वर्षांत “टाटा” आणि “मिस्त्री” यांच्यामध्ये टाटा सन्सवरील प्रभुत्वावरून वाद होत आहे. त्यातूनच ट्रस्टी नेमणुकीचा वादांचा इतिहास समोर आला आहे. हा वाद केवळ दोन कुटुंबातील नाही तर संस्थात्मक, कायदेशीर, आणि धोरणात्मक आहे.


ट्रस्टी नेमणुकीचा काय आहे वाद?

टाटा ट्रस्ट्सकडे Tata Sons या होल्डिंग कंपनीतील अंदाजे 66% शेअर आहेत. टाटा ट्रस्ट ही समाजातील उपेक्षित दुर्बल घटकांना तसेच होतकरूंना मदत करणारी दानशूर संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. याचाच अर्थ समाजाला योगदान देणारी आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणारी महत्त्वाची संस्था म्हणजे टाटा ट्रस्ट आहे.

सध्या या ट्रस्ट्समधील ट्रस्टी नेमणूक, बोर्डमध्ये कोणते ट्रस्टी येतील, व्यवसाय धोरणे कशी असतील यावरून मतभेद आहेत.Shapoorji Pallonji (मिस्त्री कुटुंबाचा भाग) यांच्याकडे टाटांच्या तुलनेत कमी शेअर्स आहेत.‌ पण त्यांना डावललं जात आहे असं यापूर्वी त्यांनी आरोप केले होते.

मिस्त्री आणि टाटा मधील वादाबाबत सरकारची काय आहे भूमिका?—
गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी टाटा समूहातील व बिझनेस लीडरची बैठक घेतली आहे. समूहात स्थैर्य पुनर्स्थापित करावे यासाठी,सूचना केल्या आहेत.
मिस्त्री vs टाटा हा टाटा समूहातील जुना वाद आहे.
सायरस मिस्त्री हे Shapoorji Pallonji कुटुंबाचे सदस्य आहेत. रतन टाटानंतर टाटा सन्सचे चेअरमन झाले.पण २०१६ मध्ये त्यांना अचानक हटवले गेले.कारण बोर्ड व ट्रस्ट्स यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव (trust deficit) निर्माण झाला होता.

त्यावर सायरस मिस्त्री यांनी न्यायालयात धाव घेत चेअरमन पदी निवड करावी अशी याचिका दाखल केली. परंतु NCLT आणि नंतर इतर न्यायालयांनी मिस्त्री यांची मागणी फेटाळून लावली. काही वर्षानंतर सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन झाले.




टाटा समूहाचे देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान खूप मोठे आहे:


FY2023-24 मध्ये टाटा समूहातील सूचीबद्ध कंपन्यांचा एकत्रित महसूल (revenue) ₹11.12 लाख कोटी पेक्षा जास्त आहे.

त्याच वर्षी समूहाला एकूण नफा (Profit After Tax, PAT) सुमारे ₹85,510 कोटी झाला.
गेल्या पाच वर्षांत महसुलात जवळपास दुप्पट वाढ, आणि नफ्यात तीनपटपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

बाजार भांडवल (market cap) बाबतीत टाटा समूह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकेकाळी त्याचा मूल्य इतर देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त पाकिस्तानच्या GDP किंवा इतर काही देशांच्या आर्थिक आकारापेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातो.

जमशेदजी टाटांचा वारसा जपत रतन टाटांनी केले होते बदल


जमशेदजी टाटा यांनी उद्योग, कल्याण, शिक्षण, आरोग्य इत्यादी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच काम केले. कर्मचाऱ्यांची welfare (आरोग्य, ग्रॅच्युइटी, अपघात भरपाई), महिलांसाठी स्वतंत्र dispensaries, बालसंगोपन, इत्यादी बाबी त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सुरू केल्या होत्या.

जमशेजी यांनी Tata Endowment Fund हे शिक्षणासाठी परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनुदान देणारी संस्था १८९२ मध्ये स्थापन केली.‌ ती नंतर Tata Trusts मध्ये विकसित झाली.

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली समूहाने आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन स्वीकारला — Tetley, Corus, Jaguar-Land Rover यांसारख्या आंतरराष्ट्रीय खरेदी (acquisitions) केल्या आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रात विस्तार झाला; TCS (Tata Consultancy Services) कंपनीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव कमावले.

टाटा समूहाने “future-fit” (भविष्यासाठी सुसज्ज) धोरणे अंगिकारली, डिजिटलायझेशन, टिकाऊ संसाधने (sustainability), नवी उद्योगामध्ये गुंतवणूक केली. गेल्या काही वर्षात Revenue दुप्पट, नफा तीनपट झाला आहे.

वाद का होतात? काय आहेत मुख्य कारणे?


टाटा आणि मिस्त्री वादांमागील काही मुळ कारणे आहेत:

1. अल्पसंख्याक vs बहुसंख्य भागीदार
  टाटा ट्रस्ट्स हे बहुतेक शेअरधारक आहेत (majority shareholder). अल्पसंख्याक भागीदार म्हणून Shapoorji Pallonji कुटुंबाचे स्वत्व (stake) आहे. त्यामुळे निर्णय, नियंत्रण, पारदर्शकता, सूचना व संवाद यामध्ये मतभेद निर्माण होतात.


2. गव्हर्नन्स आणि पारदर्शकता
  निर्णय प्रक्रिया कशी असावी, board मध्ये ट्रस्टच्या प्रतिनिधींची भूमिका, महत्त्वाच्या व्यवहारांची माहिती कधी कशी दिली जाते हे वादाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे.


3. कार्यक्षमतेचा दबाव (Performance pressure)

  अल्पसंख्याक भागीदार किंवा board/trust यांना अपेक्षा असतात की गुंतवणूक का फलदायी नाहीये, काही कंपन्या तोट्यात (loss-making) आहेत.फायदा कमी होतोय का, इ. हे प्रश्न येतात.


4. नियंत्रणाचा प्रश्न
  टाटा ट्रस्टस् कडून होल्डिंग कंपनी Tata Sons मध्ये अभ्यास, नियंत्रण ठेवण्याची गरज असते. तर दुसरीकडे, चेअरमन किंवा इतर अधिकारी काही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ इच्छितात. हा तणाव निर्माण होतो.


5. कायदेशीर आणि नियामक बाबी
  Companies Act, Articles of Association (AoA), नियम व कायदे हे महत्वाचे आहेत. removal / appointment प्रक्रिया, विशेष‭ ‬नेमणूक समिती, निवड समिती, आरबीआय इत्यादि नियम पालन होतात का होत नाही यावरून वाद होतात. सायरस-मिस्त्री प्रकरणातही Companies Act मधील कलमे आणि प्रक्रियात्मक बाबी वादग्रस्त ठरल्या.

सध्याच्या वादाचा परिणाम काय होऊ शकतो?

जर ट्रस्ट्समधील नेमणुकीचा / नियुक्तीचा वाद त्वरित सोडविला नाही तर गटातील स्थैर्य (group stability) प्रभावित होऊ शकते. व्यवसाय निर्णय, गुंतवणूक, महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी धोक्यात येऊ शकते.

सार्वजनिक विश्वास (public trust) आणि पब्लिक इमेज यावर देखील परिणाम होऊ शकतो, कारण टाटा समूह हे फार मोठी, जुनी संस्था आहे, समाजासाठी आदर्श उद्योगाचं प्रतीक आहे.

काही भागीदार / अल्पसंख्याक शेअरहोल्डर यांना न्यायालयीन / कायदेशीर पर्याय स्वीकारण्याची इच्छाही वाढू शकते.


टाटा-मिस्त्री वाद हे व्यक्तीचा संघर्ष नाही तर एक “उद्योग-संस्था, भागीदार, कायदा व विश्वासाचा” संघर्ष आहे. जमशेजी टाटांच्या सिद्धांतांमध्ये सामाजिक कल्याण, नैतिकता, प्रामाणिकपणा हे मूलभूत तत्त्व होते. रतन टाटांनी त्या सिद्धांतांना आधुनिक व्यवसाय धोरणे, जागतिक स्पर्धा करत तंत्रज्ञानाची जोड देऊन समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

पण ज्या ठिकाणी विश्वास, पारदर्शकता किंवा नियंत्रणावरील मतभेद होतात, तिथे वाद उद्भवतात — विशेषतः जेव्हा गुंतवणूक, आणि अधिकार यांचा वापर कसा होतो या बाबतीत भूमिका अस्पष्ट राहतात.