तामिळनाडूमधील मच्छिमारांच्या जाळ्यात अलीकडे एक अत्यंत दुर्मीळ मासा सापडला आहे. एरवी मासा सापडला तर मच्छीमारांना आनंद होतो. पण, हा मासा कोणता आहे, याची माहिती मिळताच सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. हा (Oarfish Caught by Fishermen in Tamil Nadu) — ‘डूम्सडे फिश’ (Doomsday Fish) म्हणून ओळखला जातो. अनेक लोकांच्या मते हा मासा समुद्रकिनारी आला तर एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं, विशेषत: भूकंप, त्सूनामीसारखं संकट येते.
ही मासळी म्हणजे ओर्फिश (Oarfish) — पृथ्वीवरचे सर्वात लांब अस्थिमत्स्य (bony fish) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे . याची लांबी १० ते ११ मीटरपर्यंत असते. पण, हा मासा समुद्रात मच्छीमारांना सापडत नाही. कारण, ही मासळी अत्यंत खोल समुद्रात राहते. त्यामुळे फारच क्वचित ती मानवी नजरेस पडते. जेव्हा पडते, तेव्हा नक्कीच काहीतरी संकट येण्याची शक्यता असते, असे मानले जाते.
डूम्सडे फिश का म्हणतात?
‘डूम्सडे फिश’ चा मराठीत अर्थ आहे, जगाचा शेवटचा दिवसं. याच नावाचे हॉलीवुडनं अॅव्हेंजर डूम्सडे चित्रपट काढून जगभराला घाबरविलं आहे. पण, त्यापेक्षा जास्त या माशानं जगाला नेहमीच घाबरविलेलं आहे.
- काही समज अथवा गैरसमज एवढे जुने असतात की त्यावर अनेकांचा विश्वास बसतो. एवढेच नाही तर हा विश्वास कित्येक देशांमध्ये ठेवला जातो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे या माशाचं सांगता येईल. जपान, फिलीपिन्स, आणि चिलीसारख्या देशांमध्ये असा समज आहे की ओर्फिश जमिनीवर किंवा किनाऱ्यावर दिसला की मोठी नैसर्गिक आपत्ती (भूकंप, त्सुनामी) होण्याची शक्यता असते. त्यामुळेच लोक अक्षरश: नैसर्गिक आपत्तीची तयारी करू लागतात.
- विशेष म्हणजे २०११ मध्ये जपानमध्ये त्सुनामी होण्यापूर्वी अनेक ओर्फिश किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडले होते, त्यामुळेच जगभरात असलेल्या अंधश्रद्धेला म्हणा अथवा समजाला आणखीनच खतपाणी मिळालं आहे.
मासळीची किती किंमत असते, मागणी असते का?
- ओर्फिश खाण्यासाठी अगदी बेचव आणि जेलीसारखा असतो. अर्थातच खवय्यांची पसंती नसल्यानं हा मासा सापडूनही मागणी नसल्यानं त्याच्या विक्रीसाठी मच्छीमार उत्सुक नसतात.
- पण, जे अत्यंत कमी म्हणा अथवा दुर्मीळ आहे, त्याला बाजारात भरपूर मागणी असते. हा मासा दुर्मीळ असल्यानं वैज्ञानिक, संशोधकांकडून आणि अॅक्वेरियम प्रदर्शनांमध्ये याला मोठी मागणी असते.
- काही ठिकाणी हे मासे लाखो रुपयांना विकले जातात. विशेषतः संशोधनासाठी किंवा सागरी संग्रहालयात ठेवण्यासाठी मागणी असते. कारण,पर्यटक अशा माशांना एकदातरी पाहावं, या विचारानं आवर्जून पाहतात. त्यामुळे खाण्यामुळे नाही तर पाहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे या माशाला चांगला भाव मिळतो.
मासळी येणं म्हणजे आपत्तीची सूचना की अंधश्रद्धा की विज्ञान? (Doomsday Fish: Myth or Science)
- जपानमध्ये याला ‘Ryugu no tsukai’ म्हणजेच “समुद्राच्या देवाचा दूत” असं म्हटलं जातं. म्हणजेच समुद्रातील देवदुतानं येऊन संकटाची वार्ता सांगण्याचा अर्थ जुन्या लोकांना अभिप्रेत असावा.
- त्यामुळेच हे मासे आपत्तीची पूर्वसूचना देतात, अशी समजूत आहे.
- वैज्ञानिकांचं म्हणणं जरा वेगळच आहे.
- हे मासे खोल समुद्रात राहतात. पण समुद्राच्या तळाशी होणाऱ्या प्लेट हालचालींमुळे ते वर येतात. तसेच त्यांना कोणते आजार किंवा जखम झाल्यास ते समुद्रकिनारी येतात.
- समुद्रातील हालचाली या भूकंप किंवा त्सुनामीची नांदी असू शकतात. ओर्फिश दिसल्यानंतर आपत्ती घडते, असा योगायोग घडतो त्यावरून अंधश्रद्धा पसरली आहे. पण, कधी-कधी योगायोग असू शकतो, नेहमीच असे घडत नाही, असे म्हटलं जातं.
जेव्हा मासा पहिल्यादांच पाहिला, तेव्हा मच्छिमारांना काय वाटलं?
- तामिळनाडूतील स्थानिक मच्छिमार म्हणतात की, “आमच्या आयुष्यात पहिल्यांदा असा अत्यंत वेगळा मासा पाहिला. त्याचे डोळे आणि लांबट शरीर पाहून आम्हाला भीती वाटली.”
- काही लोकांनी देवदूत मानून माशाची पूजा केली.
- तर काही तरुणांनी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. तर अनेकांनी वैज्ञानिक माहिती देणारी व्हिडिओ तयार केले आहेत.
अशा माशांबाबत नेमकं काय समजावं मग?
डूम्सडे फिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओर्फिशची बातमी अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्या सीमारेषेवर उभी आहे.
हा मासा अपवादात्मक असून त्याचे दर्शन अनेकांना चिंताग्रस्त वाटते. पण प्रत्येक अशा घटनेला केवळ आपत्तीची चिन्ह मानणे अंधश्रद्धा आहे. एक मात्र नक्की आहे, या निमित्तानं वैज्ञानिक दृष्टिकोन, आपण सागरी संपत्तीबाबत जागरूक असणं आणि खोल समुद्राच्या या गूढ रहस्यांकडे वळण्यासाठी उत्सुक झालो आहोत.